उत्सवबुद्धी
सण-उत्सवांमध्ये दडलेली भारतीय ज्ञानपरंपरा उलगडणारे आणि त्या ज्ञानातून जीवनात परिवर्तन घडवणारे पुस्तक.
उत्सवबुद्धी · गणेशोत्सव
१५ ते २५ सप्टेंबर २०२६
उत्सवबुद्धी हा उत्सव समजून, विचारपूर्वक आणि जबाबदारीने साजरा करण्याची दृष्टी विकसित करणारा देवल विद्या मंदिरचा शैक्षणिक उपक्रम आहे. गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्षाचे प्रशिक्षण आणि त्यातील विचार वर्तमान जीवनाशी जोडणारी हिंदी ज्ञानसत्रे आयोजित केली होती. त्यांचे व्हिडिओ आता येथे पाहता येतील.
अथर्वशीर्ष हा केवळ पठण करण्याचा मंत्र नाही. त्यामध्ये श्रीगणपतीचे स्वरूप, आत्मज्ञान, विश्वदृष्टी आणि जीवनाला दिशा देणारे विचार आहेत.
या ज्ञानसत्रांतून अथर्वशीर्षाचा अर्थ आणि वर्तमान जीवनातील त्याची उपयुक्तता सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
अथर्वशीर्षावरील हिंदी ज्ञानसत्रे क्रमाने पाहा.
मुलांना भारतीय उत्सव समजून आणि जबाबदारीने साजरे करण्यासाठी आवश्यक ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
पालक, शिक्षक, शाळा, शैक्षणिक संस्था आणि समाजाच्या सहभागातून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
भारतीय उत्सवांमागील शास्त्र, परंपरा, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारी नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा शैक्षणिक उपक्रम.

‘उत्सवबुद्धी’ हे मुलांना भारतीय उत्सवांमागील शास्त्र, परंपरा, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारी समजावून सांगणारे शैक्षणिक पुस्तक आहे.
उत्सव केवळ साजरा करण्यासाठी नसून त्यामागील अर्थ समजून, विचारपूर्वक आणि जबाबदारीने साजरा करण्याची दृष्टी मुलांमध्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘उत्सवबुद्धी’ हे मुलांना भारतीय उत्सवांमागील शास्त्र, परंपरा, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारी समजावून सांगणारे शैक्षणिक पुस्तक आहे.
उत्सव केवळ साजरा करण्यासाठी नसतो. त्यामागील अर्थ, प्रतीके, उपासना आणि कृती यांचा जीवनाशी असलेला संबंध समजून घेतला पाहिजे.
मुलांमध्ये योग्य उत्सवदृष्टी विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा आणि शैक्षणिक संस्थांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.
‘उत्सवबुद्धी’ हे नव्या पिढीला उत्सवाचा मूळ उद्देश समजावून सांगणारे आणि उत्सव ज्ञानपूर्ण, शिस्तबद्ध व सामाजिक भान राखून साजरा करण्याची दृष्टी देणारे शैक्षणिक पुस्तक आहे.
उत्सव साजरा करताना भक्ती, उत्साह आणि सहभाग या भावनांना महत्त्व असते. या भावनांना ज्ञान आणि विवेकाची जोड मिळाल्यास उत्सव अधिक अर्थपूर्ण होतो.
संस्कार आणि जबाबदारीची जाणीव नसलेले स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ शकते. त्यामुळे मुलांना योग्य वयात उत्सवांचे शास्त्रशुद्ध ज्ञान, परंपरांचा अर्थ आणि योग्य आचरण समजावून देणे आवश्यक आहे.
हे पुस्तक मुलांना प्रत्येक प्रथा विचारपूर्वक समजून घेण्यास, योग्य आणि अयोग्य यांतील फरक ओळखण्यास, आधुनिक साधनांचा विवेकपूर्ण उपयोग करण्यास आणि आपल्या कृतींचा इतरांवर होणारा परिणाम जाणून घेण्यास मदत करते.
उपासना, अध्ययन, कला, सेवा, पर्यावरण आणि सामाजिक सहभाग यांचा समतोल कसा साधावा, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. प्रश्न, कृती, आत्मपरीक्षण आणि संकल्प यांच्या माध्यमातून ज्ञान आचरणात आणण्याची दिशा मिळते.
उत्सवामागील शास्त्र, परंपरा, संस्कार आणि जीवनमूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पालक, कुटुंब, शिक्षक, शाळा, शैक्षणिक संस्था आणि समाज या सर्वांची आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी ‘उत्सवबुद्धी’ हे प्रभावी शैक्षणिक माध्यम ठरेल.
मुलांनी परंपरा जपली पाहिजे.
पण आपण त्यांना परंपरेचा अर्थ सांगितला का?
त्यांनी आरती म्हटली पाहिजे.
पण आपण त्यांना आरती समजावून सांगितली का?
त्यांनी शिस्त पाळली पाहिजे.
पण आपण त्यांच्यासमोर योग्य उदाहरण ठेवले का?
ते आदर्श नागरिक बनले पाहिजेत.
पण आपण त्यांना योग्य वयात योग्य प्रशिक्षण दिले का?
उत्सवांचे ज्ञान, संस्कार आणि योग्य पर्याय आपणच दिले नसतील, तर नव्या पिढीच्या चुका मोजण्याचा नैतिक अधिकार आपल्याला किती उरतो, याचा विचार केला पाहिजे.
नव्या पिढीला दोष देण्यापेक्षा तिला योग्य रीतीने घडवणे ही आपली जबाबदारी आहे.
सण-उत्सवांमध्ये दडलेली भारतीय ज्ञानपरंपरा उलगडणारे आणि त्या ज्ञानातून जीवनात परिवर्तन घडवणारे पुस्तक.
मूर्तीपासून विसर्जनापर्यंत, अथर्वशीर्षापासून आरतीपर्यंत आणि दूर्वेपासून मोदकापर्यंत गणेशोत्सवातील परंपरांचा अर्थ समजावून सांगणारे पुस्तक.
देवीतत्त्व, शक्ती, धैर्य, ज्ञान, संपन्नता आणि विजयादशमीचा जीवनसंदेश समजावून सांगणारे पुस्तक.
आर्थिक सहकार्यासाठी QR कोड आणि UPI आयडी अर्जामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

उत्सवबुद्धी हा ज्ञात्रा संस्थेचा शैक्षणिक उपक्रम आहे.
संस्था भारतीय ज्ञानपरंपरा, शिक्षण आणि संस्कार यांचा आजच्या पिढीच्या गरजांशी समन्वय साधणारे शैक्षणिक उपक्रम राबवते.
नोंदणी: F-42389/Pune · PAN: AACTD2929B · 12A व 80G: AACTD2929BF20251